Saturday 14 May 2016

माझा ज्ञानराचानावादी उपक्रम

1) ब्यानर माझा फळा :-
                   मित्रानो आपणाकडे जुने ब्यानर खूप पडलेले असतील.जे शाळेसाठी सध्या उपयुक्त नाहीत असे ब्यानर त्यातून निवडा व त्यांचे 1 फुट लांबी व 1 फुट रुंदी असणारे चौरस तयार करा,व कात्रीने कापून घ्या  व कापलेल्या भागांना काळा रंग द्या.मग तयार होईल माझा फळा. हा फळा छोटासा असेल,प्रत्यक मुलास अथवा गटास देता येईल.हा जास्त काळ टिकेल. पाटी सारख खराब होणार नाही अथवा फुटणार सुद्धा नाही. जर या ब्यानर फळा काही दिवसानंतर फिक्कट होत गेला तर 100ml मध्ये परत रंगवा.व हा फळा जास्त काळासाठी वापरत रहा.
1) आकार कमी  2) खर्च फारच कमी  3) हाताळण्यास सोपा. 4) पुनःपुन्हा वापरता येईल 5) लवची असल्याने गुंडाळून ब्याग मध्ये ठेवता येईल.

आवश्यक तेवढेच पाणी वापरा

मित्रानो या सुट्टी मध्ये आवश्यक असेल तेवढेच पाणी वापरा व पाण्याचा अपव्यय टाळा.
      1) पाणी वाचवणार .
      2) मिळतील त्या फुलझाडांच्या किंवा फळझाडांच्या बिया शेतात,रस्त्याच्या कडेला अथवा मोकळ्या जागेत नक्की टाकणार ...
      3) खूप आवांतर वाचन करणार...
                          हे आहेत माझे सुट्टीतील उपक्रम 

Tuesday 1 December 2015

संविधान दिन साजरा

                  जि.प.शाळा चीरेपाडा या ठिकाणी २६ नोव्हेंबर या दिवशी परिपत्रकानुसार "संविधान दिन " अतिशय उत्सहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी SMC अध्यक्ष ,सदस्य ,पालक ,माता,सहशिक्षक ,मुख्याध्यापक उपस्थित होते.प्रथम गावातून फेरी काढण्यात आली.तद्नंतर शाळेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ,संविधान सारेनामा याचे सामुहिक वाचन श्री.साबळे सर यांनी घेतले.श्री.जाधव सर यांनी या प्रसंगी मोलाचे विचार मांडले.  अशा प्रकारे हा उत्सव आनंददायी वातावरणात पार पडला.
                                             धन्यवाद ...

Friday 2 October 2015

महात्मा गांधी जयंती उत्सहात साजरी

           आज दि.२ ऑक्टोंबर महात्मा गांधी यांची जयंती.त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी . त्यांचा जन्म गुजराथ मधील पोरबंदर या गावी झाला.त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई .जन्म २ ऑक्टोंबर १८६९ ला झाला.त्यांचा विवाह कस्तुरबांशी झाला.

           कांगडी गुरुकुलाचे “आचार्य श्रद्धानंद “यांनी महात्मा ही पदवी दिली.त्यांची सत्य व अहिंसा ही शिकवण होती.”बुरा मत देखो ,बुरा मत कहो ,बुरा मत सुनो “ हा संदेश महात्मा गांधीनी दिला.त्यांची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी वार शुक्रवार संध्याकाळी ५:३० वाजता झाली.

Monday 21 September 2015

प्रेरणा गीत

धीरे धीरे यहाँ का
मौसम बदलने लगा है|
वातावरण सो रहा था,
अब ऑंख मलने लगा है|| धृ||
         
            पिछली सफर कि न पुछो,
            टूटा हुवा ये रथ है|
            जो रुक गया था कही पर ,
            अब साथ चलने लगा है|
                   धीरे...धीरे...|| 1||

हमको पता भी नाही था,
वो आग थंडी पडी है|
उस आग मे आज पानी,
सहसा उबलने लगा है|
             धीरे ...धीरे...||2||

              ये घोषणा हो चुकी है,
              मेला लगेगा यहाँ पर |
              हर आदमी घर जाकर ,
              कपडे बदलने लगा है|
                       धीरे...धीरे...|| 3||

जो आदमी मर चुके थे,
मौजूद है इस सभा मे|
हर शक्स यहाँकल्पना से,
आग निकलने लगा है|
              धीरे...धीरे...||4||
                                               
 * धन्यवाद *